Moroshi Bhairavgad Guide
Gadkille Bhatkanti Fame Shri Rohidas Thombre Sir, Mo. No. 9970893931
एक अविस्मरणीय भैरवगड ट्रेक
मंगळवार दि .4 जून 2019
"भैरवगड (मोरोशी)"
(शिवकार्य ट्रेकर्स/पत्रकार /संचालक : रोहिदास क्लासेस/गडकिल्ले भटकंती फेम श्री रोहिदास ठोंबरे सर,मो. न.9970893931)
किल्ल्याची उंची : 4000 फूट प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माळशेज जिल्हा : ठाणे
श्रेणी : अत्यंत कठीण
हा ट्रेक करायचा असेल तर,खाली तेथील प्रशिक्षित गिर्यारोहक तंत्र माहीत असलेला गाईड यांचा मो. न .खाली देत आहे.
श्री रवी भला मो.7030608766/7498061733.
जेवणाची सोय करायची असेल तर तेथील मोरोशी भैरवनाथ ढाभा ,मनू मो. न.9221729236/9271729236, हे एवढ्यासाठीच देत आहे की,कोणाची काही प्रॉब्लेम नको तेथे गेल्यावर...
किल्याबद्दल अधिक माहिती जाणून घायची असेल, तर facebook वर Rohidas Thombare किंवा you tube वर Rohidas Thombare Vlog Channel वर जा किंवा Instagram वर Rohidas Thombare जाऊन अधिक माहिती घेऊ शकता..
।।जय शिवराय।।
मंगळवारी दि 4 जून 2019 रोजी मी रोहिदास ठोंबरे आणि माझे मित्र आकाश गोडीवले,शरद मालकर व विनायक मोरे असे आम्ही चौघेजण सकाळी पहाटे 4.30 वाजता चौक वरून निघालो.तसे भरपूर जण येणार होते,पण गड चढाईला अत्यंत कठीण असल्याने त्यांना घेण्याचे टाळले.आम्हाला मुरबाड तालुक्यातील मोरोशी या गावी जायचे होते,पण कलम मुरबाड या संपूर्ण रस्त्याचे काम सुरू होते म्हणून आम्ही बदलापूर नाणेघाट मार्गे मोरोशीला आलो होतो.
निघण्याच्या अगोदर सफर सहयाद्रीची यांचे हेड किरण भालेकर सर यांच्याशी बातचीत झाली होती.किरण भालेकर सर हे प्रोफेशनल गिर्यारोहक तंत्र वापरण्यात माहीर आहेत.त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरोशी या गावी भैरवनाथ ढाबा या ठिकाणी जाऊन,तुम्ही वाहन येथे पार्क करून तुमची जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.आणि तसेच झालं आम्ही तेथे सकाळी 8 वाजता मोरोशी येथील भैरवनाथ ढाबा येथे पोहोचलो. त्याचे मालक मनू यांनी आमचे स्वागत केले.तेथे आमचे वाहन अल्टो कार पार्क करून सकाळचा नाश्ता केला.
तेवढ्यात तेथील वनरक्षक लखन पवार साहेब यांची भेट झाली,त्यांच्याशी बोलत असताना सांगितले की,साहेब आम्हांला कोणी प्रोफेशनल गिर्यारोहक तंत्र वापरणारा प्रशिक्षण घेतलेला गाईड मिळेल का,यावर साहेबांनी आम्हांला ताबडतोब तेथील परिसरातील एक बीमस कोर्स केलेला,हिमालयात ट्रेनिंग घेतलेला श्री रवी भला यांच्याशी ओळख करून दिली.रवी भला दिसायला एकदम साधा आणि सरळ स्वभावाचा होता,पण त्याच्यात असलेले गुण मात्र नक्कीच कौतुकास्पद होते.मग काय आम्हांला भैरवगड चढायला कसलंच टेन्शन नव्हतं.
भैरवनाथ ढाबा चे मालक मनू हे रवीचे चुलते होते.त्यांना आम्ही रात्रीचे जेवणाची ऑर्डर देऊन ढाब्याच्या शेजारी असलेल्या भैरवगड गुंफा मार्ग या कमानीतून आम्ही चौघेजण आणि गाईड रवी भला व त्याच्या सोबत आलेला जयराम लचके हा मुलगा असे सहाजण निघालो.जयराम लचके हा सुद्धा तेथील स्थानीक होता. जंगलात प्रवेश केल्यावर सुरुवातीला थोडी वाट सोप्पी वाटली,पण पुढील वाट अत्यंत चढाईची होती.सोबत तुमच्या भरपूर पिण्याचे पाणी आवश्यक आहे.मध्ये रवी भला जंगलातील वनस्पती आणि सहयाद्री मधील डोंगरांग यांची माहिती देत होता.
आता मात्र आम्ही भैरवनाथ मंदिर या ठिकाणी पोहोचलो होतो.भगवा पताका लावली होती तेथे,येथे रवी काढून सांगण्यात आले की गावातील अनेक भाविक भक्त येथे येत असतात. महाशिवरात्रीला येथे खूप गर्दी होते.या मंदिरात गावातील सर्वच रहिवासी यांची विशेष श्रद्धा आहे.येथील पठारावरून भैरवगड स्पष्ट दिसतो.खूप मस्त व्ह्यू आहे,फोटोग्राफी करू शकता,फक्त सावधगिरी बाळगा कारण बाजूला खोल दरी आहे.
साधारण दोन ते अडीच तास उलटून गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी कोरलेल्या एका आयताकृती पाण्याच्या टाके जवळ आम्ही पोहोचलो. पाणी पूर्ण हिरवंगार झालं होतं,पण पाण्यावर हात फिरवल्यावर सर्व पाणी पांढरे शुभ आणि बर्फासारखे थंड होते.येथे आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन पुढे निघालो .
आता मात्र खरी कसरत आणि आमची सर्वांची परीक्षा होती.येथून पुढील चढ अत्यंत थरार करणारा आहे.पण नेहमी ट्रेक करण्याऱ्याला वेगळं काही नव्हतं.
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक "; ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या डाईकवर (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर) बनवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.
माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.
या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.
आम्ही आणलेला अंदाजे 300 फूट रोप आमच्या कामी आला.गाईड रवी सर्वप्रथम वर जाऊन रोप बांधला.
पहाण्याची ठिकाणे : गडाच्या माचीवर कुठलेही अवशेष नाहीत. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जातांना डाईकच्या (बालेकिल्ल्याच्या) पायथ्यापाशी पोहोचतो. तिथेच पाऊल वाटेच्या वरच्या बाजूला पाण्याच टाक आहे. पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक आयताकृती गुहा आहे, परंतू या गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. पुढे त्याच पाऊल वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचतो. येथे साधारण ५० फूट उंचीवर कातळात खोदलेली आयताकृती गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी सुध्दा गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो.
बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा घातल्यावर आपण भैरवगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. येथून बालेकिल्ल्याच्या कातळ कड्यावर खोदलेल्या पायर्या दिसतात. अंदाजे ५० पायर्या चढल्यावर आपण एका कातळात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत शिरण्यासाठी गुहेच्या पायथ्याला एक भोक पाडलेले आहे. त्यातून सरपटतच गुहेत प्रवेश करावा लागतो. ४ फुट लांब, २ फूट रुंद व ८ फूट उंच असलेली ही गुहा चारही बाजूने बंद आहे. फक्त गुहेच्या दर्शनी बाजूच्या ५ फूट उंचीवरील कातळ आयताकृती कापलेला आहे. गुहेच्या मागच्या भिंतीवर लाकडी वासे अडकवण्यासाठी खोबण्या खोदलेल्या आहेत. या वाशांवर गवताचे छप्पर तयार केल्यावर गुहेत बसलेल्या पहारेकर्याचे ऊन व पाऊस यापासून संरक्षण होत असे.
आता मात्र पुढील वाट मात्र अत्यंत बिकट होती.गुहेच्या पुढील पायर्या उध्वस्त केलेल्या आहेत.आणि हाच सर्वात अवघड मार्ग आहे. या ठिकाणी दोर लाऊनच वर चढावे लागते.हा साधारणत: १५० फूटाचा भाग (पॅच) पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. या पायर्यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसर्या बाजूला खोल दरी आहे तसेच पायर्यांवर मुरूमाची माती साठलेली असल्यामुळे जपूनच जावे लागते.या ठिकाणी मात्र तुम्ही हलगर्जीपणा केला,तर तुमच्या जीवावर बेतू शकते,त्यासाठी माहितीशीर गिर्यारोहक तंत्र वापरणारा गाईड तुमच्या सोबत असेल तर अती उत्तम आणि आमच्या सोबत असलेला रवी गाईड याने गड माथा चढवून काही महत्त्वाच्या टिप्स पण दिल्या.
पायर्या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला कड्याला लागून एक सुकलेल टाक आहे. हे पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढून गेली वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत.या ठिकाणी कालच सफर सहयाद्री चे ट्रेकर्स येऊन येथील गाळ काढून टाक स्वच्छ केला होता. या टाक्याच्या पुढे वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते. गडमाथा अरूंद असून पूर्व - पश्चिम पसरलेला आहे. गडमाथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक ते पूर्वेला हरीश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. फायनली आम्ही 4000 फूट उंच असलेला भैरवगड सर करून महाराजांचा भगवा आणि भारतीय ध्वज फडकवला. महाराजांचा जयघोष केला .वरून दिसणारं दृश्य अविस्मरणीय होते,सर्व डोळ्यांत साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
खाली पायऱ्या उतरताना पण एक मोठं साहसी ट्रेक होता.परत खाली आम्ही भैरवनाथ मंदिर येथे येऊन थोडी विश्रांती करून,सोबत आणलेली फळे खाऊन उतरायची सुरुवात केली.जसजसा खाली येत होतो,तसतसं गडाकडे मागे वळून पाहत होतो,खरंच अगदी हृदयापासून सांगायचे झालेच तर आतापर्यंत शंभरच्या वर ट्रेक केले आहेत,पण भैरवगड मोरोशी हा ट्रेक माझ्या आयुष्यातील अती उत्तम आणि अविस्मरणीय ट्रेक होता.
पोहोचण्याच्या वाटा :मुंबई - कल्याण - मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याचे मोरोशी गाव गाठावे.
जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, मोरोशी गावातील भैरवनाथ धाब्यावर ऑर्डर देऊन गड चढण करावी.
मी तुमच्या माहितीसाठी येथील ढाब्याचे मालक मनू यांचे मो. देत आहे,तुम्ही त्यांना येणार असाल तर त्यांच्याशी संपर्क करून जेवणाची ऑर्डर देऊ शकता.
मो .न.
डाईकच्या सूचना :
(1) या गडावर यायचे असेल तर येथील स्थानिक गाईड आणि संपूर्ण गिर्यारोहक तंत्र विकसित श्री रवी भला यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.त्यांचा मो .न.खाली दिला आहे.
7030608766/7498061733
(2) जून ते ऑक्टोबर गडावर जाणे टाळावे.अर्थात पावसाळ्यात गड चढणं टाळावं.
(3) भैरवगड (मोरोशी) किल्ला सर करण्यासाठी गाईड असणे, गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे आवश्यक आहे.
(3) सोबत ३०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही.
(4) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.
(5) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.
💐💐💐💐💐
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
।।जय शंभूराजे ।।
From
(शिवकार्य ट्रेकर्स/पत्रकार/संचालक : रोहिदास कोचिंग क्लासेस/गडकिल्ले भटकंती फेम श्री रोहिदास ठोंबरे सर,मो न.9970893931.)
https://www.facebook.com/Rohidasraghothombare/posts/2170947153000925/
Comments
Post a Comment