sandhan guide - Nitin Bande
सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 2.8कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत आसते .त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल .दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन वेळेस आपल्याला दरीत आसलेले पाणी ओलांडून झावे लागते एक वेळेस दोन ते चार फूट खोल आणि दुसरे वेळेस चार ते सहा फूट खोल पाणी ओलांडून जावे लागते .नोव्हेंबरमध्ये पाण्याची पातळी थोडी जास्त असु शकते.तिथेपोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठी कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोचता येते. नाशिकहून ही घोटीमार्गे पोचता येईल. सांदन दरीच्या मुखाजवळच...